Iphone 15 Series: अॅपल कंपनी सप्टेंबर 2023 मध्ये iPhone 15 सिरीज लॉन्च करणार आहे. iPhone 15 बाजारात आल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात खप होणार असल्याचा अंदाज आताच वर्तवण्यात येतोय, त्याच्या पूर्वतयारीसाठी कंपनी यंदा मोठ्या प्रमाणात आयफोनचं (iPhone) उत्पादन सुरू करत आहे. बहुप्रतीक्षित आयफोनच्या सीरिजबद्दल आतापर्यंत अनेक रुमर्स पसरले असून अनेक फिचर्सही लीक झाले आहेत. उदाहरणार्थ, अॅपलचा हा नवा आयफोन 14 प्रो आणि प्रो मॅक्स या फोनच्या डिझाइनला एकत्र करुन बनवला जाईल आणि iPhone 15 सीरिजची किंमत आधीच्या आयफोनपेक्षा जास्त असेल, अशीही माहिती याआधी समोर आली आहे.
आता फॉक्सकॉन चीनमधील झेंग्झूमध्ये आयफोनचं चाचणी उत्पादन सुरू करत आहे. या महिन्याच्या अखेरीस उत्पादनाची चाचणी संपेल आणि मोठ्या प्रमाणात आयफोनचं उत्पादन सुरू होणार आहे.
अहवालानुसार, अॅपलला 9 कोटींपर्यंत आयफोन 15 सीरिजचे फोन स्टॉकमध्ये ठेवायला लागणार आहेत. अॅपल कंपनी प्रो मॉडेलचे सर्वाधिक उत्पादन करणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीने अलीकडेच उत्पादन आणि पुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन कर्मचार्यांसाठी मोबदला रकमेत (Incentives) वाढ केली आहे. शेन्झेन लक्सशेअर प्रिसिजन हा फॉक्सकॉन व्यतिरिक्त नवीन लाईनअपचा आणखी एक विक्रेता असेल.
कसा असणार iPhone 15?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयफोन 15 सीरिजचे (iPhone 15 Series) मोबाईल फोन हे आयफोन 14 प्रो (iPhone 14 Pro)आणि प्रो मॅक्स (iPhone 14 Pro Max) व्हेरियंटच्या डिझाइनची संमिश्र कॉपी असतील. यामध्ये टायटॅनियम फ्रेम, फ्लॅट-एज डिझाइन यांचा समावेश असू शकतो. याशिवाय, 15 सीरिजमध्ये अधिक प्रगत कॅमेरे देण्यात येतील. यात ऑटोफोकससह नवीन फ्रंट-फेसिंग कॅमेरा, पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 48MP मुख्य कॅमेरा असू शकतो.
नवीन A17 बायोनिक प्रोसेसर आयफोन 15 सीरिजला आणखी मजबूत करेल असा अंदाज आहे. ही चिप A16 बायोनिक प्रोसेसरपेक्षा मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता बजावू शकते. हा फोन कदाचित USB-C चार्जिंग पोर्टसह उपलब्ध केला जाऊ शकतो.
iPhone 15 च्या सीरिजची किंमत किती असेल?
आयफोन 15 ची सर्वसाधरणपणे किंमत ही 80,000 हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तर, आयफोन 15 प्रो या मॉडेलची किंमत 1,30,000 रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. जेव्हा आयफोन 14 भारतात लॉन्च झाला, तेव्हा त्याची किंमत 79,900 रुपये होती. तर आयफोन 14 प्रो या मॉडेलची किंमत ही 1,29,000 हजार रुपये इतकी होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jio Bharat Phone: अवघ्या 999 रुपयांत जिओने आणला 4G फोन; महिन्याचा रिचार्ज फक्त 123 रुपयांत