(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tamil Nadu Blast : तामिळनाडूत दोन फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट, 14 जणांचा मृत्यू
Tamil Nadu Firecracker Explosions : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांना लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Tamilnadu Firecracker Explosions : तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील रंगापालयम आणि किचिन्यकनपट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मंगळवार या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तामिळनाडूत दोन फटाक्यांचा कारखान्यात स्फोट
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस, अग्निशमन आणि बचाव कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी मिळून आग विझवण्याचा आणि पीडितांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पीटीआयशी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, "शिवकाशीच्या फटाक्यांच्या कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळावरून सापडलेल्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही."
स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची माहिती
पहिली दुर्घटना रंगपालयम येथे घडली. रंगपालयमच्या फटाका कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचार्यांनी स्थानिकांसह आग विझवली. येथून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले अशसून त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. दुर्घटनेत मृत्यू झालेले लोक येथे काम करणारे मजूर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात आणखी तीन जण जखमी झाले होते, नंतर उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
VIDEO | Several killed in blasts at two separate fireworks units at Sivakasi in Virudhunagar district of Tamil Nadu. More details are awaited. pic.twitter.com/GEvLmapj3B
— Press Trust of India (@PTI_News) October 17, 2023
दुसरी दुर्घटना किचनायकनपट्टी गावातील फटाक्यांच्या कारखान्यात घडली. या दुर्घटनेच एकाचा मृत्यू झाला, तर दोन महिला मजूर जखमी असून त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
9 ऑक्टोबरलाही घडली दुर्घटना
याआधी 9 ऑक्टोबरलाही तामिळनाडूच्या अरियालूर फटाके युनिटमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 3 महिलांचा समावेश आहे. ही घटना वेत्रियूर मदुरा विरागुलर गावात घडली. या प्रकरणी कारखान्याचे मालक राजेंद्र आणि त्यांचा जावई अरुण कुमार यांना अटक करण्यात आली आहे. दिवाळीमुळे इतर 30 कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते, जे ओव्हरटाईम करत होते.
महत्वाच्या इतर बातम्या :