एक्स्प्लोर

..तर गाड्यांवर बुलडोझर फिरवू, गडकरींचा वाहन कंपन्यांना दम

प्रदूषण नियंत्रण आणि इंधन आयतीला वेसण घालण्याच्या निर्धाराशी मी कटिबद्ध आहे, असं गडकरींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली: पर्यावरणपूरक गाड्या बनवा अन्यथा, कार कंपन्यांवर बुलडोझर चालवला जाईल. पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बनवणाऱ्यांचा बॅण्ड-बाजा वाजवणार, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार कंपन्यांना दिला. सिअॅम या कार उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. वीजेवर चालणाऱ्या गाड्यांसदर्भात मंत्रिमंडळाचा अहवाल तयार आहे. त्यामध्ये वाहनं चार्ज करणाऱ्या स्टेशन्सचा विचार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलंय. सर्व कार कंपन्यांनी 2030 पर्यंत इलेक्ट्रिक कारच्या दिशेने वाटचाल सुरु करण्याचा सल्ला गडकरींनी दिला. “सरकार कोणत्याही परिस्थितीत तेल किंवा पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांपासून सुटका करु इच्छित आहे. त्यासाठी 2030 पर्यंतची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तोपर्यंत कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारचं उत्पादन वाढवलं नाही, तर पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या आणि धूर सोडणाऱ्या गाड्या आणि कार कंपन्यांवर बुलडोझर चालवला जाईल”असं गडकरी म्हणाले. प्रदूषण नियंत्रण आणि इंधन आयतीला वेसण घालण्याच्या निर्धाराशी मी कटिबद्ध आहे, असंही गडकरींनी यावेळी नमूद केलं. आपल्याला पर्यायी इंधनाकडे वाटचाल करावी लागेल. मी जे बोलतोय ते तुम्हाला आवडणार नाही. पण त्याबद्दल मी तुम्हाला (कार कंपन्यांना) विचारणारही नाही. मी या गाड्या उद्ध्वस्त करणार. प्रदूषण, वाहन आयातीबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. आयात घटवणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी नितीही ठरली आहे. ज्या कंपन्या सरकारचं समर्थन करतील, त्या फायद्यात राहतील, पण ज्या कंपन्या ‘नोटा छापण्यात’ व्यस्त असतील त्यांना मात्र त्रास होईल. त्या कंपन्यांवर/गाड्यांवर बुलडोझर चालवला जाईल. त्यावेळी तुम्ही आमच्याकडे वाहनांचा ढिग आहे म्हणून सरकारकडे मदतीसाठी येऊ नका, असं गडकरींनी ठणकावलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
Embed widget