Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमाला (Ram Mandir Pran Pratishtha ceremony in Ayodhya) देशभरातून अनेक लोकांनी हजेरी लावली, त्यामध्ये अध्यात्मिक विश्वगुरू रामभद्राचार्यही (Swami Rambhadracharya) सहभागी झाले होते. श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर रामभद्राचार्य काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. हा कार्यक्रम झाल्यानंतर रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आणि येत्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने मोदी पुन्हा सत्तेत येतील असा अंदाज व्यक्त केला. 


रामललाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आध्यात्मिक गुरू रामभद्राचार्य म्हणाले की, मी सध्या प्रचंड भावुक झालो आहे. प्रभू राम वनवासातून परत येण्याच्या वेळी वशिष्ठ ऋषींची जी परिस्थिती होती, तशीच आज माझी स्थिती आहे. आता यापलीकडे मी काय बोलू?"


मोदींच्या भेटीवर रामभद्राचार्य काय म्हणाले?


भव्य राम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आध्यात्मिक गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय चर्चा झाली असं विचारल्यानंतर गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, मोदींनी आपली प्रकृत्ती विचारली आणि आपण त्यांना शभेच्छा दिल्या.


 






मोदी 350 हून अधिक जागा जिंकतील 


येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकतील की नाही आणि किती जागा जिंकतील असा प्रश्न विचारल्यानंतर अध्यात्मिक गुरू रामभद्राचार्य म्हणाले, मोदी ही निवडणूक आरामात जिंकतील. यावेळी त्यांना 350 हून अधिक जागा मिळतील. 


 






रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, "राम लल्लाचा अभिषेक सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला. राम लल्लाचा अभिषेक सोहळा अतिशय शांततेत आणि योग्य विधींनी पार पडला.


ही बातमी वाचा :