एक्स्प्लोर

Suspicious Bag Found: राजधानीत घातपाताचा कट उधळला, संशयस्पद बॅगमध्ये आढळले IED, एनएसजीकडून तपास सुरु

Suspicious Bag Found in Delhi : नवी दिल्ली पोलीस, स्पेशल सेल, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळावर पोहचले असून तपास सुरु आहे.

Suspicious Bag Found in Delhi : राजधानी नवी दिल्लीमध्ये घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. राजधानीतील ओल्ड सीमापुरी (Old Seemapuri) परिसरात गुरुवारी दुपारी एका संशयस्पद बॅगमध्ये IED आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. नवी दिल्लीचे स्पेशल सेल आणि बॉम्ब शोधक पथकाने माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तसेच घटनेचं गांभिर्य ओळखून एनएसजी पथकही पोहचले. या प्रकरणाचा सध्या तपास करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीतील ओल्ड सीमापुरी परिसरातील एका घरात गुरुवारी दुपारी संशयस्पद बॅग (Suspicious Bag) आढळली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. याची सूचना दिल्ली पोलिसांना तात्काळ देण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलीस, स्पेशल सेल आणि एनएसजी घटनास्थळी दाखल झाले. संशयस्पद बॅगमधून आयइडी जप्त करण्यात आले. ज्या घरात संशयस्पद बॅग आढळली ते कासिम नावाच्या व्यक्तीचे होते. कासिमने काही दिवसांपूर्वी प्रॉपर्टी डीलर शकीलच्या मदतीने घराचा दुसरा मजला भाड्याने दिला होता. 

दहा दिवसांपूर्वी या तीन मुले राहण्यासाठी आले होते. पोलीस पोहचण्यापूर्वी सर्वजण बॅग घरातच सोडून पसार झाले. गुरुवारी दुपारी दोन वाजता पोलिसांना संशयस्पद बॅगबद्दल माहिती मिळाली होती. स्पेशल सेलच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही संशयस्पद बॅग ओल्ड सीमापुरी परिसरातील घर क्रमांक  डी-49 मिळाली.  दरम्यान, दिल्लीमधील गाजीपूर परिसरात काही दिवसांपूर्वीच RDX मिळाले होते. याचा तपास करत असताना स्पेशल सेल सीमापुरी परिसरातील या घरात पोहचली होती. तपासादरम्यान संशयस्पद बॅग आढळली. ही बॅग पॅक केलेली होती. एनएसजी पथकाडून याचा तपास केला जात आहे.

गेल्या महिन्यात आढळली होती RDX ने भरलेली बॅग -
14 जानेवारी 2022 रोजी गाजीपूर भाजी मंडई गेट क्रमांक एकच्या बाहेर एक बॅग मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक एकच्या बाहेर अनुपमने आपली स्कुटी पार्क केली होती. त्याच जागी RDX ने भरलेली बॅग आढळली होती. पोलिसांना या बॅगबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ भाजी मंडईकडे धाव घेतली होती. त्यानंतर आठ फूट लांब खड्डा करण्यात आला. एनएसजी पथकाने ती बॅग त्या खड्ड्यात ठेवली होती. थोड्यावेळानंतर मोठा स्फोट झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

Embed widget