एक्स्प्लोर

गोव्यात आढळला निपाहचा पहिला संशयित रुग्ण; उपचार सुरु

केरळमध्ये काही भागात निपाह विषाणूने थैमान घातलं आहे. केरळमधील थंड प्रदेशांच्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी बरीच गोमंतकीय कुटुंबं गेली आहेत.

पणजी : गोव्यात निपाह विषाणूचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. हा निपाह विषाणूचाच रुग्ण असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेलं नाही. पण त्याच्याविषयी संशय असल्याने त्याला बांबोळीतील गोमेकॉ अर्थात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना याविषयी विचारलं असता, ते म्हणाले की, 'चिंता करण्यासारखं काही कारण नाही. गोमेकॉ रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णाला ठेवण्यात आलं आहे. हा रुग्ण केरळमधून गोव्यात रेल्वेने आला होता. हा रुग्ण गोमंतकीयच आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या केरळमधील भागाला या रुग्णाने मुळीच भेट दिली नव्हती. त्याला स्वत:ला संशय आल्यानंतर त्याने गोमेकॉत धाव घेतली. त्याच्या रक्ताचे नमूने पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येतील. निपाह विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणं आढळल्याने संभाव्य धोका पत्करायला नको, या हेतूने आम्ही त्याला देखरेखीखाली ठेवले आहे. पण अजून काही सिद्ध झालेले नाही. पुणे येथे चाचण्या होऊन अहवाल आल्यानंतर बाकीच्या गोष्टी समजतील'. केरळमध्ये काही भागात निपाह विषाणूने थैमान घातलं आहे. केरळमधील थंड प्रदेशांच्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी बरीच गोमंतकीय कुटुंबं गेली आहेत. त्यापैकी कुणाला निपाह विषाणूची लागण झाल्याचं उदाहरण अजून समोर आलेलं नाही. आता प्रथमच संशयित रुग्ण सापडल्याने गोवा प्रशासनही सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने गोव्याला अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच पाठवली आहेत. गोवा सरकारने राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये ही मार्गदर्शक तत्त्वे पाठवली आहेत. कुणालाही निपाहचा संशयित रुग्ण आढळला तर गोमेकॉ रुग्णालयास त्याबाबतची माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे. निपाह विषाणूची लागण झाल्याचे दाखवून देणारे कोणते संकेत असतात, याविषयीही गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने जनजागृती अभियान सुरु केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget