मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याचा भार अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकडे हे खातं जाणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुत्रांच्या मते, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथूर यांचंही नाव संरक्षणमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. तसेच त्यांच्यासोबत ज्येष्ठ मंत्री नरेंद्र तोमर यांचंही नाव चर्चेत आहे.
दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी सुरेश प्रभूंनी रेल्वे मंत्रिपदाचा कारभार सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे फेरबदलात संरक्षण कुणाला मिळणार? प्रभूंचं काय होणार? याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बातम्या :
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना अजूनही वेटिंग लिस्टवरच!