चेन्नई : नीट परीक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचललं आहे.
17 वर्षीय अनिता तामिळनाडूतील अरियालुर जिल्ह्यातील कुझुमुर गावची रहिवासी असून, तिला बारावीमध्ये 98 टक्के मिळाले होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला वैद्यकीय क्षेत्रात करीअर करायचे होते. पण राज्य सरकारच्या एका अध्यादेशामुळे तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले होते.
कारण गेल्या वर्षापर्यंत तामिळनाडूत मेडिकलसाठी प्रवेश 12 वीच्या मार्कांवर मिळत होता. मात्र राज्य सरकारने नीट परीक्षेच्या आधारेच मेडिकलसाठी प्रवेश देण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केला. त्यामुळे राज्यात नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती.
पण या विरोधात अनितासह काही विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली. नीट परीक्षेचा अभ्यासक्रम सीबीएससी पॅटर्नवर अधारित असल्याने, ती परिक्षा अतिशय अवघड झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी मागणी अनिताने सुप्रीम कोर्टाकडे केली.
पण सुप्रीम कोर्टानं 22 ऑगस्टच्या आपल्या निर्णयात नीट परीक्षेनुसार प्रवेश देण्याचा निर्णय दिला. त्यातच अनिताला नीटच्या परीक्षेत केवळ 86 टक्के मिळाल्यानं तिला मेडिकलसाठी प्रवेश मिळाला नाही. अखेर नैराश्येपोटी तीनं हे टोकाचं पाऊल उचलंल.
दरम्यान, अनिताने मेडिकल शिवाय इंजिनिअरिंगसाठीही प्रवेश परीक्षा दिली होती. त्यात तिला चांगले गुण मिळाले होते. विशेष म्हणजे, मद्रास इन्सटिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी तिला सहज प्रवेश मिळत होता. पण तिला वैद्यकीय क्षेत्रातच करीअर करायचे असल्याने, तिने इंजिनिअरिंग करणे टाळले.
अनिताच्या आत्महत्येनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ पलानीस्वामी यांनी कुटुंबाला 7 लाखांची मदत जाहीर केली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नीट परीक्षेविरोधात लढणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2017 05:54 PM (IST)
नीट परीक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचललं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -