गोरखपूर : गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजचे डॉक्टर कफील खान यांना अटक करण्यात आली आहे. गोरखपूरमधील चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणात कफील खान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
10 आणि 11 ऑगस्ट रोजी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बीआरडी हॉस्पिटलमध्ये चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉ. कफील खान यांना एनआयसीयूच्या प्रमुखपदावरुन हटवण्यात आले होते.
सरकारी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना डॉ. कफील हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. कफील खान यांच्या पत्नी डॉ. शबिस्ता खान गोरखपूरमध्ये मेडिस्प्रिंग चिल्ड्रन हॉस्पिटल चालवतात. याच हॉस्पिटलमध्ये डॉ. कफील खानही प्रॅक्टिस करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.
संबंधित बातम्या :
गोरखपूर दुर्घटना : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची यूपी सरकारला नोटीस
गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू
गोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं 30 मुलांचा मृत्यू
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोरखपूर दुर्घटना : BRD मेडिकल कॉलेजमधील डॉ. कफील खान यांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2017 11:55 AM (IST)
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणात कफील खान यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -