एक्स्प्लोर

Supriya Sule: बहिणीचं कल्याण करणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो; संसदेत सुप्रिया सुळेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला

Supriya Sule: बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे.

नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, या विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणावर बोलताना अजित पवारांना (Ajit Pawar) सणसणीत टोला लगावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत एक वक्तव्य केलं त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे चांगल्याच बरसल्या.  बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

त्याचं झालं असं की, लोकसभेत बुधवारी (20 सप्टेंबर) अमित शाह यांनी महिला आरक्षणावर बोलत असताना एक वक्तव्य केलं. यावेळी अमित शाह म्हणाले की, महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असं नाही, पुरुषही बोलू शकतात, कारण भावांनाही बहिणीची काळजी असते. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना  टोला लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येक घरात असतोच असं नाही. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं की त्यांना चांगलं चिंतणारा भाऊ मिळेल"

सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवरही निशाणा

महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजपच्या नेत्यांनाही खडसावलं. भाजपचे एकेकाळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्यानं मला ऑन कॅमेऱ्यावर घरी जाऊन जेवण बनवण्यास सांगितलं होतं. ही भाजपची प्रवृत्ती आहे. "सुप्रिया सुळे, घरी जा, जेवण बनवा, देशी कोणी दुसरा चालवू शकतो", असं म्हटलं गेल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगत चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याची आठवण करुन दिली आणि चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

भाजपला चांगलंच खडसावलं

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्या दुसऱ्या एका मंत्र्यानं देखील माझ्याबद्दल ऑन कॅमेरा अपशब्द वापरले, त्यामुळे या सर्व घटनांवर भाजपनं उत्तर दिलंच पाहिजे. तुमचे मंत्री लोकांमधून निवडून आलेल्या महिलेबद्दल वैयक्तिक टिप्पणी करतात. मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देखील दिली नव्हती, ती द्यायची गरज देखील मला वाटली नव्हती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आणि महिला आरक्षणावर बोलणाऱ्या भाजपला चांगलंच खडसावलं. यावेळी पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचंही जाहीर केलं. 

हेही वाचा:

Hingoli : भाजप आमदाराची हिंगोलीतील नरसी नामदेव विश्वस्ताला बेदम मारहाण, हिशोब विचारल्यानंतर राग अनावर झाल्याने कृत्य

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget