नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली होती.
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती.
तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत मी सुप्रीम कोर्टात दाद मागू, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. त्यानुसार अर्जुन खोतकारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज निकाल सुनावणी होणार आहे.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द
दरम्यान, आमदारकी रद्द झाल्याने काल (7 डिसेंबर) झालेल्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत अर्जुन खोतकर यांना मतदान करता आलं नव्हतं.
कोण आहेत अर्जुन खोतकर?
- अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते असून, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आमदार आहेत. जालना मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात.
- 1990, 1995, 2004 आणि 2014 असे एकूण चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1999 साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
- सध्या खोतकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत.
- आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणासाठी अर्जुन खोतकर ओळखले जातात. शिवसेनेची आक्रमकता त्यांच्या वक्तृत्त्वशैलीतून ठळकपणे दिसून येते.
तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर
2014 ची जालना विधानसभेची निवडणूक
जालना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अर्जुन खोतकर, काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल, भाजपकडून अरविंद चव्हाण, बसपाकडून अब्दुल रशीद अशा महत्त्वाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली.
शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 296 मतांनी विजय मिळवला. त्यांना 45078 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसचे तत्कालिन आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. गोरंट्याल यांना 44782 मतं मिळाली होती.
भाजपचे अरविंद चव्हाण 37,591 मते मिळाली, तर बसपा उमेदवार अब्दुल रशीद यांनी 36,350 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.
संबंधित बातम्या
एकाच दिवशी 187 क्विंटल तूर विक्री, अर्जुन खोतकरांची चौकशी
खोतकरांची एसीबीमार्फत चौकशी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Dec 2017 09:20 AM (IST)
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -