एक्स्प्लोर

हादिया-शफिनचं लग्न वैध, सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

हादिया-शफिनचं लग्न वैध असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने जोडप्याला मोठा दिलासा दिला. केरळ हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला

नवी दिल्ली : हादिया आणि शफिन जहां यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हादिया-शफिनचं लग्न वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टीस ए एम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. एनआयएने या प्रकरणात तपास सुरु ठेवावा, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं. दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेलं लग्न हायकोर्ट रद्द करु शकतं का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने 22 फेब्रुवारी रोजी हायकोर्टाला केला होता. 25 वर्षीय हादियाने गेल्या महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. आपण स्वेच्छेने इस्लाम धर्मात परिवर्तन केलं होतं आणि पती शफिन जहांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. काय आहे प्रकरण? केरळमध्ये राहणाऱ्या हादिया या हिंदू तरुणीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि शफिन जहाँ या मुस्लिम तरुणाशी लग्न केलं होतं. हे 'लव्ह जिहाद'चं प्रकरण असल्याचं सांगत ओमानहून परतलेल्या हादियाच्या पालकांनी केरळ हायकोर्टात धाव घेतली होती. हादियाचं लग्न रद्द करण्याची मागणी तिच्या पालकांनी केली होती. गेल्या वर्षी हायकोर्टाने हादियाच्या पालकांच्या बाजूने निकाल दिला. मे महिन्यात केरळ हायकोर्टाने हादियाचं लग्न रद्द ठरवून तिला पालकांकडे जाण्याचे आदेश दिले होते. हादियाचा पती शफिनने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. हादिया सज्ञान असून तिला जोडीदार निवडण्याचा अधिकार असल्याचं त्याने सांगितलं. हादियाचं ब्रेनवॉश करुन तिला धर्मांतराची जबरदस्ती करण्यात आली आहे, तिला सीरियाला नेण्यात येणार आहे, असा दावा तिच्या पालकांनी केला होता. नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने हादियाची तिच्या पालकांपासून सुटका केली होती. लग्नापूर्वी ती शिकत असलेल्या तामिळनाडूतील कॉलेजमध्ये शिक्षण सुरु ठेवण्याची परवानगी तिला देण्यात आली.

संबंधित बातम्या :

दोघं म्हणाले लग्न झालं, म्हणजे झालं, कोर्टाचा हादियाला दिलासा

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Embed widget