एक्स्प्लोर

फटाके फोडण्याचे दोन तास राज्य सरकारने ठरवावेत: सर्वोच्च न्यायालय

दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठीच्या वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही बदल केले आहेत. फटाके फोडण्यासाठीचे दोन कधी द्यायचे, हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता प्रत्येक राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकरणी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आधी रात्री 8 ते 10 ही वेळ निश्चित केली होती. धार्मिक परंपरेचा दाखला देत तामिळनाडू सरकारने या संबंधी याचिका केली होती.

नवी दिल्ली : दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठीच्या वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही बदल केले आहेत. फटाके फोडण्यासाठीचे दोन कधी द्यायचे, हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता प्रत्येक राज्य सरकारला दिले आहेत.  या प्रकरणी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आधी रात्री 8 ते 10 ही वेळ निश्चित केली होती. या दोन तासाची परवानगी कुठल्या वेळेत द्यायची याबाबत राज्य सरकारला अधिकार दिले आहेत. यामध्ये सकाळी एक तास आणि रात्री एक तास असा  देखील वेळ दिला जाऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे.
धार्मिक परंपरेचा दाखला देत तामिळनाडू सरकारने या संबंधी याचिका केली होती. न्यायालयाने म्हटले आहे की, तामिळनाडू सरकार कोणत्या वेळेत फटाके वाजवायचे ते सरकार ठरवेल.  न्यायालयाने कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्यात यावेत आणि ते फक्त परवानाधारक विक्रेत्यांनीच विकावेत, असे निर्देश याआधीच दिले होते. शिवाय फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निर्धारित करण्यात आली होती.
ऑनलाईन फटाके विक्रीवरही सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. केवळ दिवाळीच नाही, तर प्रत्येक सण-उत्सवांसाठी हा नियम लागू असेल, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. जस्टिस एके सिकरी आणि जस्टिस अशोक भूषण यांनी 28 ऑगस्ट रोजी यावर निर्णय राखून ठेवला होता.दिवाळीत होणारं ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण टाळण्यासाठी देशभरात फटाक्यावर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. या प्रकरणातील याचिकाकर्ते अर्जुन गोपाल, आरव भंडारी, झोया भसिन हे तिघेही बाल याचिकाकर्ते होते. तीन ते चार वर्षांची ही मुलं आहेत. त्यांच्यावतीने वकील गोपाल शंकर नारायणन यांनी देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती.
याचिकाकर्त्यांनी सुनावणीच्या दरम्यान दिल्लीतल्या गंगाराम हॉस्पिटलच्या श्वसन विभागाच्या प्रमुखांनाही कोर्टात आणलं होतं. डॉक्टर अरविंद कुमार यांनी कोर्टात अनेक ग्राफिक्स, फोटोग्राफ्ससह याचे दुष्परिणाम दाखवले. फटाक्यांच्या प्रदूषणाचा सर्वात जास्त 28 ते 30 टक्के फटका लहान मुलांना बसतो. आपण आपल्या कारकीर्दीत लहान मुलांची अशी काळवंडलेली फुफ्फुसं पहिल्याचं त्यांनी व्यथित होऊन सांगितलं होतं.
सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणण्याचा विरोध केला आहे. फटाक्यांसाठी नियम बनवणं हे चांगल पाऊल असेल. पण अॅल्युमिनिअम आणि बेरियम यांचा वापर रोखणं हे चुकीचं आहे, असा युक्तिवाद केंद्र सरकारकडून सुनावणीवेळी करण्यात आला होता. कोणत्याही संशोधनाशिवाय दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणली गेली. यामुळे अनेकांचा रोजगार गेला. प्रदूषणाला फटाक्यांव्यतिरिक्त इतर गोष्टीही जबाबदार आहेत, असं तामिळनाडू सरकार, फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टानेही गेल्या सुनावणीत यावर आपलं मत नोंदवलं होतं. आपण एक व्यापक दृष्टीकोन ठेवत प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी आणायला हवी, की तात्पुरता दृष्टीकोन ठेवत फक्त फटाक्यांवर बंदी आणायला हवी, असा सवाल जस्टिस सिक्री आणि जस्टिस अशोक भूषण यांच्या खंडपीठाने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget