एक्स्प्लोर

व्यभिचाराच्या केसमध्ये महिला दोषी नसणार : सुप्रीम कोर्ट

व्यभिचाराच्या केसमध्ये केवळ विवाहितेशी संबंध ठेवणारा 'परपुरुषच' अपराधी असेल, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला.

नवी दिल्ली : लग्नानंतर परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिला कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार नसतील. म्हणजेच व्यभिचाराच्या केसमध्ये केवळ विवाहितेशी संबंध ठेवणारा 'परपुरुषच' अपराधी असेल, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बुधवारी यासंदर्भात सुनावणी केली. व्यभिचार हा गुन्हा असावा की नाही, याबाबत विचार करु, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला दोषी ठरवणाऱ्या कलम 497 शी छेडछाड न करण्याची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. भारतीय दंड विधानातील कलम 497 समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन करतं का, याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती खंडपीठाने दिली. काय आहे कलम 497? कलम 497 अन्वये विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणारा पुरुष दोषी ठरतो. त्याला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मात्र संबंधित महिला या प्रकरणात आरोपी नाही, किंवा तिला कोणतीही शिक्षा सुनावण्याची कायदेशीर तरतूद नाही. कलम 497 रद्द केल्यास भारतीय संस्कृतीवर परिणाम होईल आणि लग्नसंस्था मोडकळीस येईल, अशी भीती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात शपथपत्राद्वारे व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कलम 497 ची वैधता तपासण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. हा कायदा अत्यंत जुनाट वाटतो आणि स्त्री-पुरुषांना समान मानत नाही, असं खंडपीठाने म्हटलं होतं. मात्र केंद्राने हे कलम अनिवार्य असल्याचं म्हटलं. केरळमधील जोसेफ यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. लिंगाच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या कलम 497 च्या वैधतेवर पुनर्विचार करावा, असं याचिकेत म्हटलं होतं. 'व्यभिचाराच्या प्रकरणात एकटा पुरुषच नादी लावतो का? महिला व्यभिचारात सहभागी असू शकत नाही का? दुसऱ्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषालाच तुरुंगवास व्हावा का? पतीची संमती असल्यास प्रेयसीची मुक्तता होऊ शकते का? विवाहबाह्य संबंधांसाठी पतीची संमती घ्यायला महिला ही केवळ उपभोगाची वस्तू आहे का?' असे प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Embed widget