Param Bir Singh Case : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा आहे. परमबीर सिंह यांनी अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे. परमबीर सिंह हे भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दिली. परमबीर सिंह हे 48 तासांमध्ये हजर राहू शकतात अशीही माहिती त्यांच्या वकिलाने दिली. 


परमबीर सिंह हे भारतातच आहेत. हाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना जीवाचा धोका असल्याने ते समोर येत नाही असे त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात म्हटले. सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे निर्देश देत तपास, चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. 


परमबीर सिंह यांनी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यांनाच तक्रारदार केले जात असल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले. परमबीर सिंह हे 48 तासांमध्ये कोणतेही सीबीआय अधिकारी अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली. 


सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांनी चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे. 


परमबीर सिंह यांच्याविरोधात पाच खंडणीप्रकरणी वेगवेगळे गुन्हे


माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गोरगांव येथील खंडणी प्रकरणाचा तपास करणार्‍या गुन्हे अन्वेषण विभागानं परमबीर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र ते हजर न राहील्यानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं. खंडणीच्या गुन्ह्यात आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे कुठेही सापडत नसल्यानं अखेर  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीनं विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांना फरार घोषित करण्यात यावे असा विनंती करणारा अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर  मुख्य अतिरिक्त दंडाधिकारी भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी अ‍ॅड. शेखर जगताप यांनी या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 388, 389, 120-ब व 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट ही जारी केल्याची माहिती दिली.

 

या तिन्ही आरोपींना त्यांच्या उपलब्ध पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ते तिथं आढळले नाहीत. परमबीर यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरातील त्यांचा सुरक्षारक्षक सतीश बुरुटे व खानसामा रामबहादूर थापा यांनी परमबीर व त्यांचे कुटुंब मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे तिघेही फरार झाल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांना फरार घोषित करण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम 82 व 83 अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी आणि फरार घोषीत करावे अशी विनंती केली. याची दखल घेत मुख्य अतिरिक्त महानगर दंडाधिकारी भाजीपाल यांनी फरार घोषीत करण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर जर महिन्याभरात परमबीर सिंह कोर्टापुढे हजर झाले नाहीत तर त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होऊ शकते.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या: