Abhinandan Awarded Vir Chakra : हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्काराने आज, सोमवारी सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्धमान यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उपस्थिती दर्शवली. याआधी हवाई दलाने अभिनंदन वर्धमान यांना विंग कमांडरवरुन ग्रुप कॅप्टन अशी बढती दिली आहे. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचा वीर चक्राने सन्मान होणार आहे. वीर चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. शत्रूला धूळ चारण्यात दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी रोजी मिग-21 बायसेन या विमानातून पाकिस्तानच्या एफ-16 विमानांचा पाठलाग करुन, एक विमान पाडलं होतं. त्यानंतर एका मिसाईलनने त्यांच्या विमानाला लक्ष्य केलं. विमान कोसळण्याआधी अभिनंदन बाहेर पडले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अडकले आणि पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तानने त्यांना कैद केलं होतं. परंतु भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानला अभिनंदन यांना सोडावं लागलं.
जम्मू काश्मीरमध्ये एका सर्च ऑपरेशन दरम्यान ए ++ श्रेणीच्या दहसतवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या नायब सूभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याशिवाय पाच दहशतवाद्यांना कंठस्थान घालणारे मेजर विभूती शंकर ढौंडियाल यांनाही मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संबधित बातम्या :
पाकिस्तानात शारीरिक नाही पण मानसिक छळ झाल्याची अभिनंदन यांची माहिती
भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी