नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजिअमने (Supreme Court Collegium) दहा वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजिअमची आज बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजिअमने खालील दहा नावांची शिफारस केली आहे.


1. किशोर चंद्रकांत संत
2. वाल्मिकी मेन्झेस
3. कमल रश्मी खता
4. शर्मिला उत्तमराव देशमुख
5. अरुण रामनाथ पेडणेकर
6. संदीप विष्णूपंत मारणे
7. गौरी विनोद गोडसे
8. राजेश शांताराम पाटील
9. अरिफ साहेल डॉक्टर
10. सोमशेखर सुदर्शन


कोलॅजिअम म्हणजे काय? 
सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांचा एक गट म्हणजे कोलॅजिअम (Supreme Court Collegium) व्यवस्था होय. यामध्ये सरन्यायाधीशांचाही समावेश असतो आणि तेच याचे प्रमुख असतात. देशभरातल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्या या कोलॅजिअमकडून केल्या जातात. 1990 साली या व्यवस्थेती निर्मिती करण्यात आली आणि 1993 सालानंतर देशातल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या या कोलॅजिअमकडून करण्यात येऊ लागल्या. 


सर्वोच्च न्यायालयातील आणि देशातील सर्व उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नियुक्त्या, बदल्या, प्रमोशन कोलॅजिअमकडून केले जातात. कोलॅजिअम न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांची शिफारस ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे करतात. त्यानंतर त्याला मंजुरी मिळते.


पण महत्त्वाचं म्हणजे कोलॅजिअम व्यवस्थेची भारतीय राज्यघटनेत कोणतीही नोंद नाही किंवा उल्लेख नाही. न्यायप्रणालीचे स्वातंत्र्य जपण्यासाठी, लोकशाहीच्या मुल्यांची जपणूक करण्यासाठी कोलॅजिअमची निर्मिती करण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha