एक्स्प्लोर
ट्रिपल तलाकबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार

नवी दिल्ली: मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाक पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. संविधान खंडपीठ आजपासून दररोज ट्रिपल तलाकवर सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जगदिश सिंह खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ ही सुनावणी करणार आहेत. सुप्रीम कोर्टात सहा दिवस ही सुनावणी चालणार आहे. दोन-दोन दिवस विरोधी आणि समर्थकांनी युक्तीवाद करावा, त्यानंतर 1-1 दिवस एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी, असं कोर्टाने म्हटलं आहे. या खंडपीठात शिख, ख्रिश्चन, पारशी, हिंदू आणि मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या न्यायाधिशांचा समावेश आहे. आज पहिल्या दिवशी या प्रकरणात कोणत्या मुद्यांवर सुनावणी करायची, हे ठरवलं जाणार आहे. मुस्लिम पर्सनल लॉमधील कालबाह्य तरतुदींवरही या सुनावणीदरम्यान युक्तीवाद होणार आहेत. तसंच निकाह, हलाला आणि बहुविवाह पद्धतीवरही खंडपीठासमोर सुनावणी केली जाईल. ट्रिपल तलाकविरोधात सर्वोच्च न्यायालयात सात याचिका दाखल झाल्या आहेत. यापैकी 5 याचिका या मुस्लिम महिलांनी दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांमधून तीन तलाक पद्धत हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतून काय उहापोह केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या: कोर्टातच बायकोला ‘ट्रिपल तलाक’ देऊन पती फरार!
चहाचा कप हातातून निसटला, पती म्हणाला तलाक...तलाक...तलाक...
मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, तोंडी तलाक क्रूरपणा: अलाहाबाद हायकोर्ट
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट






















