एक्स्प्लोर

Sukma Naxalite encounter | नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, छत्तीसगडच्या सुकमामध्ये 17 जवान शहीद, 14 जखमी

नक्षली आणि जवानांमध्ये तब्बल तीन तास ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी इथून पळून गेले. घनदाट जंगल आणि वातावरणाची स्थिती खराब असल्याने या जवानांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. ड्रोनच्या मदतीने जवानांचा शोध घेतला जात होता.

सुकमा : देश कोरोनाच्या महामारीशी सामना करत असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधत छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला केला आहे. सुकमामध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत तर 14 जवान जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरुन परतत होते. या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले. यातील 12 जवान डीआरजीचे तर 5 जवान हे एसटीएफचे असल्याची माहिती आहे. यापैकी जखमींना शनिवारी रात्री उशीरा या जखमी जवानांना एअरलिफ्ट करुन रायपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सुमारे 300 डीएआरजी आणि एसटीएफचे जवान या भागात एका कामगिरीवर निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जवानांना घेरले. त्यानंतर नक्षली आणि जवानांमध्ये तब्बल तीन तास ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी इथून पळून गेले. घनदाट जंगल आणि वातावरणाची स्थिती खराब असल्याने या जवानांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. ड्रोनच्या मदतीने जवानांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, शनिवारी रात्री डीजीपी डीएम एवस्थी यांनी मुख्यंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांच्या टीमला नक्षलवाद्यांचा म्होरक्या हिडमा याच्या कॅम्पची माहिती मिळाली होती. यानंतर त्याच्या शोधासाठी हे जवान निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिसांनी 4 ते 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं असल्याची देखील माहिती आहे. हे नक्षलवादी बुलेट प्रुफ जॅकेट घालून आले होते. हिडमा देखील या चकमकीत जखमी झाला असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; डिव्हायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला, दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले
पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; डिव्हायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला, दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
UK Election 2024 : ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''
''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi NewsPM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पाABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; डिव्हायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला, दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले
पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; डिव्हायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला, दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
UK Election 2024 : ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
ब्रिटनमध्ये आज मतदान, ऋषी सुनक यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न, केयर स्टारर यांचं तगडं आव्हान
''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''
''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''
Narsayya Adam : प्रणिती शिंदेंच्या विधानसभेच्या जागी आडम मास्तरांची तयारी सुरू, आमदारकीचा वेध घेण्यासाठी सज्ज
प्रणिती शिंदेंच्या विधानसभेच्या जागी आडम मास्तरांची तयारी सुरू, आमदारकीचा वेध घेण्यासाठी सज्ज
Team India: नमो, जर्सी नंबर 1... टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना दिलेली जर्सी पाहिलीत का?
Team India: नमो, जर्सी नंबर 1... टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना दिलेली जर्सी पाहिलीत का?
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
kolhapur Crime : कोल्हापुरात दगडाने ठेचण्याची मालिका सुरुच; आता इचलकरंजीत अल्पवयीन युवकाच्या डोक्यात दगड घातला
कोल्हापुरात दगडाने ठेचण्याची मालिका सुरुच; आता इचलकरंजीत अल्पवयीन युवकाच्या डोक्यात दगड घातला
Embed widget