एक्स्प्लोर
संघातून बाहेर पडलेल्या वेलिंगकरांचा नवा पक्ष

पणजी (गोवा) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडल्यानंतर सुभाष वेलिंगकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. 'भारतीय भाषा सुरक्षा मंच' असं या पक्षाचं नाव आहे. गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेच्या अनुदानावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठी फूट पडली होती. सुभाष वेलिंकरांनी यासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर तोफही डागली होती. मात्र आता त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केलीय. गोवा विधानसभा निवडणुकीत हा पक्ष शिवसेनेसोबत जागा लढवणार आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वेलिंगकरांवर टीका "पक्ष काढताना आपल्या मागे किती लोक आहेत, हे पहिलं पहावं. येत्या निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे हे कळेलच.", अशी टीका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्यावर केली आहे.
Before You Go
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं





















