नवी दिल्ली : 'नीट' अर्थात नॅशनल एलिजिबीटी टेस्टबाबत मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मेडिकलचे प्रवेश 'नीट'नुसारच होणार असून राज्यांना वेगवेगळी सीईटी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.



सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं ?


'नीट 1' देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 'नीट 2' परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या मते 'नीट 1' परीक्षा व्यवस्थित पार पडली नाही किंवा परीक्षेची पूर्ण तयारी झाली नव्हती, त्या विद्यार्थ्यांनाही नीट 2 देण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नीट 1 ची उमेदवारी रद्द करावी लागणार आहे.



मात्र मेडिकलचे प्रवेश 'नीट' परीक्षेनुसारच होणार असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे. राज्यांना वेगवेगळी सीईटी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. नीटच्या प्रश्नी महाराष्ट्रासह 8 राज्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहत त्यांचं नुकसान होऊ न देण्याचं आश्वासन दिलं होतं. ऐनवेळी विद्यार्थ्यांची धावपळ टाळण्यासाठी 2018 पासून नीट परीक्षा लागू करण्याची मागणी केली होती.



कोर्टाच्या निर्णयानुसार रविवारी 1 मे रोजी नीट 1 परीक्षा पार पडली. 'नीटच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक आहे. नीटविरोधातील अनेक राज्य आमच्या भूमिकेशी सहमत आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात लढणार आहोत. नीटची परीक्षा 2018 पासूनच लागू करा', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.




संबंधित बातम्या :


सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?


'नीट'विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार


त्यापेक्षा अभ्यास करा, 'नीट'बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली


‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश