मुंबई : योगगुरु रामदेवबाबा यांनी आता अनेक क्षेत्रांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पतंजलीच्या माध्यमात अन्न आणि औषध व्यवसायात उतरलेले रामदेवबाबा आता टीव्ही रिअॅलिटी शो घेऊन येत आहेत.


 

 

रामदेव बाबांनी ट्विटर अकाऊण्टवरुन भजन गायन रिअॅलिटी टीव्ही शो सुरु करण्याची घोषणा केली आहे. कार्यक्रमाचं नाव 'भजनरत्न' असून भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक टीव्ही वाहिनी आस्था चॅनेलवर या शोचं प्रसारण होणार आहे.

 

 

सुप्रसिद्ध भजनसम्राट, पद्मश्री अनुप जलोटा यांच्यावर स्पर्धकांच्या परीक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

https://twitter.com/yogrishiramdev/status/728867060961320964