एक्स्प्लोर

एसबीआय लवकरच डेबिट कार्ड हद्दपार करणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने या वर्षी मार्च महिन्यात 'योनो कॅशपाईंट्स' सेवा सुरु केली आहे, ज्यामधून ग्राहक डेबिट कार्डच्या वापराशिवाय पैसे काढू शकतात. ही अतिशय सोपी आणि सुरक्षित सेवा आहे.

मुंबई : भारतातील मोठी आणि सर्वाधिक शाखा असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली आहे. "डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा आमचा इरादा आहे आणि आम्ही ते नक्कीच करु," असं बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितलं. रजनीश कुमार म्हणाले की,  देशभरात सध्या सुमारे 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. डेबिट कार्डलेस देश बनवण्यासाठी 'योनो' प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची असेल. या 'योनो' प्लॅटफॉर्मद्वारे कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात किंवा कार्ड स्वाईप न करता खरेदी करता येऊ शकते. "बँकेने आधीच 68 हजार 'योनो' कॅशपॉईंट्स बसवले आहेत. येत्या दीड वर्षात कॅशपॉईंट्सचा हा आकडा दहा लाख करण्याची योजना आहे, जेणेकरुन कार्डचा वापर आणखीच कमी होईल. येत्या पाच वर्षात प्लास्टिक कार्डचा (डेबिट कार्ड) वापर मर्यादित होईल. तसंच येत्या काळात ग्राहकांच्या खिशातील क्रेडिट कार्ड हा 'स्टॅण्ड बाय'चा पर्याय म्हणूनच राहिल," असं रजनीश कुमार यांनी सांगितलं. स्टेट बँक ऑफ इंडियाने या वर्षी मार्च महिन्यात 'योनो कॅशपाईंट्स' सेवा सुरु केली आहे, ज्यामधून ग्राहक डेबिट कार्डच्या वापराशिवाय पैसे काढू शकतात. ही अतिशय सोपी आणि सुरक्षित सेवा आहे. सुरुवातीला ही सेवा 16 हजार 500 एटीएममध्ये उपलब्ध होती. आता बँक आपले सगळे एटीएम या सेवेने अपग्रेड करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
Pune Crime Khalil Shaikh: खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
Embed widget