Srikanth Poojari :  हुबळीमध्ये 1992 साली झालेल्या दंगल प्रकरणातील आरोपी श्रीकांत पुजारी (Srikanth Poojari) याला हुबळी कोर्टाने (Hubli Court) जामीन मंजूर केला आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पडल्यानंतर हुबळीत दंगल उसळली होती. या प्रकरणातील तो आरोपी होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर भाजपने राज्यभरात काँग्रेस सरकारविरोधात निदर्शने सुरू केली होती. 


श्रीकांत पुजारींच्या अटकेनंतर कर्नाटकमधील विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झाला होता. 30-31 वर्ष जुने प्रकरण उकरून काढून अटक करण्यात आली आहे.. यातून सरकार सूडबुद्धीने कार्यवाही करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. इतक्या वर्षानंतर कारवाई कशी काय असा सवालही त्यांनी केला.


अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेच्या काही दिवसाआधीच अशी कारवाई करण्यामागे सरकारचा हेतू काय आहे, हे दिसून येत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी केली. सरकार भेदभाव आणि जनतेच्या पैशांचा दुरुपयोग करून अशी कारवाई करू शकत नाही, असे भाजप नेते अश्वथ नारायण यांनी म्हटले होते.






 






कोण आहे श्रीकांत पुजारी?


हुबळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षीय श्रीकांत पुजारी यांच्यावर गेल्या 31 वर्षांत 16 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दंगल घडवून दुखापत केल्याप्रकरणी एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. 1991 व्यतिरिक्त 1999, 2001 आणि 2014 मध्येही त्याच्यावर दंगलीचे आरोप होते.


“त्याच्यावर (पूजारी) तीन प्रतिबंधात्मक कारवाई अहवालांसह एकूण 16 खटले आहेत. त्यामुळे बुटलेगिंग, मटका जुगाराची एकूण 13 प्रकरणे आहेत आणि तो दोन पोलिस स्टेशनमध्ये रॉयडी शीटर आहे, ”पीटीआयने हुबली-धारवाडच्या पोलिस आयुक्त रेणुका सुकुमार यांच्या हवाल्याने सांगितले.