RBI Imposes Penalties On 5 Banks: रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) काही बँकांवर मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे. या बँकांना 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच पाच बँकांवर मोठी कारवाई केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.


 






कोणत्या पाच बँकांवर केली कारवाई?


रिझर्व्ह बँकेने पाच बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये श्री भारत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (वडोदरा, गुजरात) आणि संखेडा नागरीक सहकारी बँक लिमिटेड (छोटौदेपूर, गुजरात) या दोन बँकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर संखेडा नागरी सहकारी बँक लिमिटेडने अशी कर्जे मंजूर केली, ज्यात बँकेच्या संचालकांचे नातेवाईक जामीनदार म्हणून उभे होते. आरबीआयकडून को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (परलाखेमुंडी, ओडिशा) आणि भुज कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (कच्छ गुजरात) यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने लिमडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर सर्वात कमी दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम 50 हजार रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


मुंबई रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या