एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : कर्नाटकातील सर्वात लक्षवेधी ‘बदामी’ची लढाई

भाजपनं बदामी मतदारसंघातून खाणसम्राट जनार्दन रेड्डींचे निकटवर्तीय श्रीरामुलूंना तिकीट दिलं आहे. खाणसम्राट आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जी.जनार्दन रेड्डींचे ते जवळचे मित्र आहेत.

बंगळुरु : बदामी... बदामी रंगाचं गाव. जगाच्या नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून बदामी प्रसिद्ध आहे. गेल्या 8-15 दिवसांपासून बदामी चर्चेत आहे, कारण इथून कर्नाटकचे विद्यामान मुख्यमंत्री सिद्धरामय्या निवडणूक लढत आहेत. सिद्धरामय्यांच्या प्रचाराची धुरा विद्यमान आमदार चिमनकट्टींच्या खांद्यावर आहे. ते पॅरालिसिसमुळे फार अँक्टिव नाहीत. पण आता ते गावोगाव फिरत आहेत. सिद्धरामय्यांसमोरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, तो त्यांच्या उपरेपणाचा. गेल्या पाच निवडणुका त्यांनी चामुंडेश्वरीतून लढवल्यात आणि जिंकल्यात. पण यावेळी सिद्धरामय्यांचा पाडाव करण्यासाठी भाजप, जेडीएस आणि स्वपक्षीयसुद्धा टपून बसलेत. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी कुरबा मतांची व्होटबँक असलेल्या बदामीत त्यांनी सुरक्षित आसरा शोधला आहे. बदामीऐवजी राज्यातला इतर कुठल्याही मतदारसंघाला पसंती न देण्याचं कारणही तसंच आहे. बदामी मतदारसंघात 2.5 लाख मतदार आहेत. सिद्धरामय्या ज्या कुरबा अर्थात ज्या धनगर समाजातून येतात त्यांची संख्या 55 हजार आहे. दलित मतांची संख्या 46 हजार इतकी आहे. तर मुस्लिम मतं 25 हजाराच्या घरात आहेत. शिवाय 80 हजाराच्या घरात लिंगायत मतं आहेत. त्यामुळे चामुंडेश्वरीऐवजी बदामीतून विजयी होणं सिद्धरामय्यांसाठी सोपं आहे. पण सिद्धरामय्यांची वाट तितकी सोपी नाही. कारण भाजपनं इथं खाणसम्राट जनार्दन रेड्डींचे निकटवर्तीय श्रीरामुलूंना तिकीट दिलं आहे. 46 वर्षांचे श्रीरामुलु बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे बदामीच्या लोकांसाठी ते सिद्धरामय्यांइतकेच उपरे आहेत. खाणसम्राट आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जी.जनार्दन रेड्डींचे ते जवळचे मित्र आहेत. श्रीरामुलु हे वाल्मिकी समाजाचं नेतृत्व करतात, त्यामुळे दलित मतांसाठी त्यांचीही बॅटिंग सुरु आहे. बेल्लारीतून जी.जनार्दन रेड्डींना हद्दपार व्हावं लागल्यानंतर श्रीरामुलुंनीच त्यांचा मोर्चा सांभाळला. गोरगरीबांना मदत करणारा नेता अर्थात रॉबिनहूड टाईप इमेज त्यांनी निर्माण केली आहे. अर्थात पैसा प्रसिद्धी कशातच श्रीरामुलु कमी नाहीत. हायप्रोफाईल लढतीमुळे निवडणुकीचे मुद्दे बाजूला पडले आहेत. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असूनही गावात पक्का रस्ता नाही. इथं अजूनही नळ अस्तित्वात नाही, बोअरवेलचं पाणी दोन चाकी छकड्यावरुन आणलं जातं. ज्यात महिलांना जीव नकोसा होतो. अनेक गावांमध्ये बसेसचा पत्ता नाही. पर्यटनस्थळ असलं तरी त्याची वास्तपुस्त नीट नसल्यानं तिथंही पुरेसा रोजगार नाही. चालुक्याचा इतिहास सांगणारं, सुंदर मंदिरांचं, लेण्यांचं, गुहांचं गाव यावेळी दोन ताकदीच्या उमेदवारांमुळे चर्चेत आहे इतकाच काय तो निवडणुकीमुळे झालेला बदल. कर्नाटक जो कौल देईल तोच ट्रेंड 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. त्यामुळे चालुक्याच्या काळातील लेण्यांच्या पाऊलखुणा जशा शेकडो वर्षांनी बदामीत जिवंत आहेत, त्याप्रमाणेच इथला जय-पराजयसुद्धा राजकीय इतिहासात आपल्या खुणा ठळकपणे आधोरेखित करेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget