एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : कर्नाटकातील लिंगायत मठांचं राजकारण

कर्नाटकात आजवर 22 मुख्यमंत्री होऊन गेले. त्यातले आठ मुख्यमंत्री लिंगायत समाजाचे होते. बी. एस. येडियुरप्पांवर घराणेशाही, भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं ते महत्वाचं कारण होतं.

बंगळुरु : हुबळीत आल्यानंतर कुठलाही राजकीय नेता गुरुसिद्ध राजयोगेंद्र स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो. कारण लिंगायत समाजासाठी मूरसाविर मठाचं महत्व सर्वोपरी आहे. इथून निघालेली सूचनासुद्धा आदेश म्हणून पाळली जाते. त्यामुळेच लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळाल्याने हा समाज काँग्रेसच्या दिशेनं वळवण्यासाठी मठांची मदत होण्याची शक्यता आहे. मूरसाविर मठाप्रमाणे अख्ख्या कर्नाटकात 4 हजारांवर छोटे-मोठे मठ आहेत. पण प्रमुख 30 मठांना लोकमान्यता आणि राजमान्यता आहे. त्यामुळेच एरवी मठांच्या भरवशावर असलेल्या भाजपसाठी लिंगायत मठच डोकेदुखी होऊन बसली आहे. लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मतांचं पक्कं गणित बसवण्यासाठी सिद्धरामय्या सरकारनं हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमली. संपूर्ण अभ्यासाअंती दास समितीनं लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली जाऊ शकते असा निष्कर्ष काढला आणि सिद्धरामय्यांनी तो लगेच अंमलात आणला. कर्नाटक सरकारनं लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला. शिवाय हा प्रस्ताव राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडेही धाडला. त्यामुळे कर्नाटकातील लिंगायत मठांनी आणि मठाधीशांनी आपलं वजन काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याची चर्चा आहे. कर्नाटकात लिंगायत समाज 15 ते 18 टक्के आहे. वोक्कलिगांची लोकसंख्याही 11 टक्के आहे. अनुसूचित जाती-जमाती तब्बल 22 टक्के आहेत. तर मुस्लिम समाजही 18 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे काँग्रेसला जर ही मतं मिळाली तर तो बोनस ठरु शकतो. कर्नाटकात आजवर 22 मुख्यमंत्री होऊन गेले. त्यातले आठ मुख्यमंत्री लिंगायत समाजाचे होते. बी. एस. येडियुरप्पांवर घराणेशाही, भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं ते महत्वाचं कारण होतं. पण अमित शाह यांनी लिंगायत हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचं वक्तव्य करुन लिंगायतांचा रोष ओढवून घेतला आणि मठाधीशांची नाराजीही. कर्नाटकातल्या बेळगाव, बिदर, बागलकोट, विजापूर, गदग, कोप्पल, धारवाडसह 14 जिल्ह्यांमध्ये लिंगायतांचं वर्चस्व आहे. जवळपास 96 ते 102 जागा लिंगायतांच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणं अशक्य आहे. मात्र त्याबाबतही मतमतांतरं आहेत. कर्नाटकात जेडीएस किंगमेकर असेल असं बोललं जातंय. पण खऱ्या अर्थी किंगमेकरची भूमिका यावेळी 14 टक्के लिंगायत मतंच पार पाडणार आहेत. त्यामुळे मठांमधून निघणाऱ्या सिक्रेट संदेशांसाठी प्रत्येक दौऱ्यात शाह, मोदी आणि राहुल यांचं मठपर्यटन सुरु आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देईल का? याबाबत साशंकता आहे. मात्र तरीही सिद्धरामय्यांनी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन लिंगायतांना गोंजारलं. त्यांना आपल्या बाजूला आणलं. उद्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं विपरीत निर्णय दिला, तरी सिद्धरामय्या हिरो म्हणूनच वावरतील. भाजपला व्हिलन म्हणून प्रोजेक्ट करतील. त्यामुळेच मोदींना दक्षिणेत मिळालेली ही तोलामोलाची लढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget