नवी दिल्ली : रामनाथ कोविंद यांची देशाचे 14 राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आज निरोप देण्यात येणार आहे. यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये औपचारिक निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, सर्व मंत्रिमंडळ आणि लोकसभा, राज्यसभेतले सर्व खासदार उपस्थित असतील. संध्याकाळी 5.30 वाजता संसदेच्या मुख्य सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
प्रणव मुखर्जींनी आपल्या पाच वर्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात पदाची प्रतिभा उंचावली आहे. शिक्षक ते नेता आणि मग देशाचे राष्ट्रपती असा प्रणव मुखर्जींचा राजकीय प्रवास त्यांच्यातल्या व्यक्तिमत्त्व आणि विद्वत्तेचाच एक भाग दाखवतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
त्यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रपती आणि राज्यपाल पदापूर्वी 'महामहिम' हे संबोधन वापरण्याची परंपरा मोडीत काढली. याशिवाय, पंतप्रधान मोदींच्या आग्रहास्तव राष्ट्रपती भवनातील शाळेत शिक्षक दिनादिवशी विद्यार्थ्यांना शिकवण्यास परवानगी देण्यात आली. याशिवाय राष्ट्रपती भवनात एका संग्रहालयही उभारण्यात आलं. जिथे सर्वसामान्य नागरिकांना राष्ट्रपती भवनाचं वैभव सहज पाहता येईल.
आपल्या कार्यकाळात प्रणव मुखर्जींनी तीन वर्ष मोदी सरकारसोबत, तर दोन वर्ष मनमोहन सिंह सरकारसोबत काम केलं. या संपूर्ण कार्यकाळातील त्यांची कामगिरी राष्ट्रपती पदाची प्रतिभा उंचावणारी ठरली.
11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमधील बीरभीम जिल्ह्यात जन्मलेल्या प्रणवदांनी 1969 मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. 1969 पासून सलग पाच वेळा ते राज्यसभेचे खासदार होते. तर 1997 मध्ये त्यांना उत्कृष्ठ संसदपटू या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2004 मध्ये पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवून लोकसभेत प्रवेश केला.
काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याने गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. शिवाय, मित्र पक्षांशी चांगले संबंध असल्याने त्यांना यूपीए सरकारचे संकटमोचक म्हणून ओळखलं जाई. यूपीए सरकारच्या काळात अर्थ मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. याशिवाय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचं कामही त्यांनी पाहिलं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना निरोप देण्यासाठी दिल्लीत खास कार्यक्रमाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2017 03:18 PM (IST)
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये औपचारिक निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, सर्व मंत्रिमंडळ आणि लोकसभा, राज्यसभेतले सर्व खासदार उपस्थित असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -