पटना : बिहारमध्ये लालू प्रसाद यादव कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकीय वादळ क्षमण्याचं नाव घेत नाही आहे. कारण या प्रकरणी जेडीयूने तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी या आधीच तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यास नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव दोन्ही पक्षांचं गठबंधन तुटू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. तर जेडीयूचे आणखी एक नेते के.सी. त्यागी यांच्या मते, गठबंधनाची पुढील दिशा निश्चित करण्याची जबाबादारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आरजेडी आणि जेडीयू यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महागठबंधनासंदर्भात चर्चा झाली. पण नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या एका पत्रकार परिषदेची आठवण करुन देत, लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करावी, असं स्पष्ट केलं.
या भेटीनंतर नितीश कुमार यांनी शरद यादव यांचीही भेट घेतली. या भेटीतही तेजस्वी यादव यांचा राजीनामा आणि महागठबंधनाच्या पुढील दिशेवर चर्चा झाली. पण नितीश कुमारांनी तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर ठाम भूमिका घेतली. तर दुसरीकडे शरद यादव यांनी महागठबंधन तोडण्यासंदर्भात मवाळ भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी भाजपने नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर कारवाई झाली नाही, तर 28 जुलैपासून विधानसभेचं अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या
राजीनामा द्या, अन्यथा हकालपट्टी, तेजस्वी यादवांना स्पष्ट आदेश
...तर आम्हीही राजीनामा देऊ, राजद नेत्यांचा निर्धार
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर कारवाई होणार?
तेजस्वी यादवांना बरखास्त करा, आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ: भाजप
लालूंनी आमदारांची बैठक बोलावली, बिहारमध्ये राजकीय भूकंप?
बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्यातील वाद विकोपाला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2017 10:59 AM (IST)
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकीय वादळ क्षमण्याचं नाव घेत नाही आहे. कारण या प्रकरणी जेडीयूने तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी या आधीच तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यास नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -