एक्स्प्लोर

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना निरोप देण्यासाठी दिल्लीत खास कार्यक्रमाचं आयोजन

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये औपचारिक निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, सर्व मंत्रिमंडळ आणि लोकसभा, राज्यसभेतले सर्व खासदार उपस्थित असतील.

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद यांची देशाचे 14 राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आज निरोप देण्यात येणार आहे. यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये औपचारिक निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, सर्व मंत्रिमंडळ आणि लोकसभा, राज्यसभेतले सर्व खासदार उपस्थित असतील. संध्याकाळी 5.30 वाजता संसदेच्या मुख्य सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रणव मुखर्जींनी आपल्या पाच वर्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात पदाची प्रतिभा उंचावली आहे. शिक्षक ते नेता आणि मग देशाचे राष्ट्रपती असा प्रणव मुखर्जींचा राजकीय प्रवास त्यांच्यातल्या व्यक्तिमत्त्व आणि विद्वत्तेचाच एक भाग दाखवतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रपती आणि राज्यपाल पदापूर्वी 'महामहिम' हे संबोधन वापरण्याची परंपरा मोडीत काढली. याशिवाय, पंतप्रधान मोदींच्या आग्रहास्तव राष्ट्रपती भवनातील शाळेत शिक्षक दिनादिवशी विद्यार्थ्यांना शिकवण्यास परवानगी देण्यात आली. याशिवाय राष्ट्रपती भवनात एका संग्रहालयही उभारण्यात आलं. जिथे सर्वसामान्य नागरिकांना राष्ट्रपती भवनाचं वैभव सहज पाहता येईल. आपल्या कार्यकाळात प्रणव मुखर्जींनी तीन वर्ष मोदी सरकारसोबत, तर दोन वर्ष मनमोहन सिंह सरकारसोबत काम केलं. या संपूर्ण कार्यकाळातील त्यांची कामगिरी राष्ट्रपती पदाची प्रतिभा उंचावणारी ठरली. 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमधील बीरभीम जिल्ह्यात जन्मलेल्या प्रणवदांनी 1969 मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. 1969  पासून सलग पाच वेळा ते राज्यसभेचे खासदार होते. तर 1997 मध्ये त्यांना उत्कृष्ठ संसदपटू या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2004 मध्ये पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवून लोकसभेत प्रवेश केला. काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याने गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. शिवाय, मित्र पक्षांशी चांगले संबंध असल्याने त्यांना यूपीए सरकारचे संकटमोचक म्हणून ओळखलं जाई. यूपीए सरकारच्या काळात अर्थ मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. याशिवाय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचं कामही त्यांनी पाहिलं.

महत्त्वाच्या बातम्या

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget