एक्स्प्लोर

Special Parliament Session : नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज

Parliament Special Session: 19  सप्टेंबरपासून  नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19  सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे. 

Parliament Special Session: केंद्र सरकारनं (Modi Government) संसदेचं विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावलं आहे. 18 सप्टेंबरपासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे.  दुसऱ्या दिवशी म्हणजे 19  सप्टेंबरपासून  नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19  सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे. 

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तारखा जेव्हा जाहीर झाल्या, तेव्हा हे अधिवेशन गणेशोत्सवाच्या काळात का होतंय यावरुन खासदारांनी टीका केली होती. त्यातही महाराष्ट्रातल्या खासदारांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे हा सवाल उपस्थित होत होता. संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन 28 मे रोजी करण्यात आलं होतं. मोदी सरकारच्या वर्धापन दिनाच्या आसपासच हा मुहूर्त निवडला गेला होता.पण त्यानंतर संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाज मात्र जुन्याच इमारतीतून झालं होतं. उद्घाटनाच्या वेळीही सेनगोल पूजा करुन धार्मिक प्रतिकांचं महत्व मोदींनी अधोरेखित केलं होतंच. गणपती ही बुद्धीची देवता आहे. हिंदू संस्कृतीमध्ये  कोणत्याही चांगल्या कामाचा श्रीगणेशा हा गणपतीचे स्मरण करुन केले जाते. याच पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीचा मुहूर्त हा नव्या संसदेच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी निवडण्यात आला आहे.  

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. पण अधिवेशन कशासाठी हे गुलदस्त्यात असल्याने विरोधक केंद्र सरकारवर प्रचंड नाराज आहेत. तर एक देश एक निवडणूक यासह 10 विधेयक मांडले जाण्याची चर्चा होतेय.  विशेष अधिवेशात भाजपच्या सर्व खासदारांनी आपली कामं रद्द केल्याची माहिती मिळत आहे. तसेच अधिवेशन काळात केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी, सचिव, कॅबिनेट सचिव यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एकापाठोपाठ वेगाने घडणाऱ्या घटना पाहून नेमके अधिवेशन काळात काय घडणार याची उत्सुकता वाढत चालली आहे. 

हे ही वाचा : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Embed widget