एक्स्प्लोर
स्पाईसजेटची मान्सून स्पेशल ऑफर, बस, रेल्वेपेक्षाही स्वस्त तिकीट
नवी दिल्लीः स्पाईसजेट या विमान कंपनीने प्रवाशांसाठी खास मान्सून बोनांझा ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार स्पाईसजेटच्या आंतरदेशीय विमान प्रवासाचं एकेरी मुल्य केवळ 444 रुपये असणार आहे. या तिकिटाव्यतिरिक्त प्रवाशांना अतिरिक्त कर भरावा लागणार आहे.
आजपासून ही ऑफर 26 जून रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. या दरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर 1 जुलै 2016 ते 30 सप्टेंबर 2016 या कालावधीत प्रवास करता येणार आहे. ही ऑफर केवळ स्पाईसजेटच्या आंतरदेशीय विमानांसाठी असणार आहे.
या मार्गांवर 444 रुपये तिकीट
- जम्मू ते श्रीनगर
- मुंबई ते अहमदाबाद
- मुंबई ते गोवा
- दिल्ली ते देहरादून
- दिल्ली ते अमृतसर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement