एक्स्प्लोर
विम्याच्या पैशांसाठी निर्दयी मुलांनी आईला गाडीखाली चिरडलं!

लखनौ : विम्याच्या 10 लाख रुपयांच्या हव्यासापायी दोन निर्दयी मुलांनी आईला गाडीखाली चिरडलं. उत्तर प्रदेशातील बेंदा येथे ही अत्यंत खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. विम्याच्या पैशांसाठी मुलांनी स्वत:च्याच आईच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार गाडीखाली चिरडून आईची हत्या केली. तिंदवारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या बेंदा गावाजवळ ही घटना घडली. नातेवाईकांच्या माहितीनुसार, मृत महिलेचा 21 वर्षीय मुलगा राहुल आईला दर्शनासाठी चित्रकुटला घेऊन गेला होता. चित्रकुटहून दर्शन घेऊन परतत असताना त्याने बेंदा गावाजवळ गाडी थांबवली. ठरलेल्या कटानुसार दुसरा मुलगाही घटनास्थळी पोहोचला आणि स्वत:च्या आईलाच दोन्ही निर्दयी मुलांनी गाडीखाली चिरडलं. नातेवाईकांनी महिलेच्या हत्येमागे मुलांवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर विम्याची कागदपत्रं हाती लागली आणि मुलांनीच हत्या केल्याचेही समोर आले. आईची हत्या केल्यानंतर दोन्ही मुलं अपघाताचा बनाव रचण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलासांच्या चौकशीत सत्य उघड झालं. दरम्यान, आपल्या निर्दयी भावांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृत महिलेच्या मुलीने केली आहे.
Before You Go
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय






















