Sidhu Moose Wala : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेत सिद्धू मुसेवाला आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावात मोठी गर्दी उसळली होती. झालेली गर्दी लक्षात घेऊन पोलीसांना तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूची चौकशी होणार आहे. जोपर्यंत चौकशीचे आदेश येत नाहीत, तोवर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. आदेश मान्य करण्यात आल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंजाबमधील आप सरकारकडून सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी मानसा जिल्ह्यामध्ये सिद्धू यांची अज्ञातांनी गोळ्या मारून हत्या केली होती. त्यामुळे आप सरकारवर चौफेर टीका होत आहे. सिद्धू यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन काल करण्यात आले. 5 डॉक्टर्सच्या टीमने शवविच्छेदन केले होते. दरम्यान, उत्तराखंड स्पेशल टॉस्क फोर्स (STF) च्या मदतीने काही संशयितांना पकडल्याची माहिती आहे. पकडण्यात आलेले लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. संशयितांना देहराडूनमधील नया गाव चौकीवर पकडण्यात आले. त्या सर्वांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
पंजाब पोलिसांनी सोमवारी सिद्धू हत्याकांड महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा केला होता.काही लोकांची चौकशी केल्यानंतर महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सिद्धू यांची हत्या होण्यापूर्वी त्यांच्या गाडीचा हल्लेखोर पाठलाग करत असल्याचे सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिोओतून दिसून येते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीवर हत्येमध्ये सामील असल्याची शंका आहे. तो संशयित हेमकुंड साहिब यात्रेकरूंच्या गर्दीत लपला होता.पंजाब आणि उत्तराखंडच्या पोलिसच्या संयुक्त टीमने त्याला ताब्यात घेतले. सिद्धू यांच्यावर असॉल्ट रायफलमधून ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सिद्धू मुसेवाला यांनी काँग्रेस तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हे गँगवाॅर असल्याचे पोलिसांचे मत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या