Sidhu Moose Wala : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या मृतदेहाचं सोमावारी (30 मे) पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या पर्थिवावार आज (31 मे) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, सिद्धू मुसेवाला यांचा विवाह सोहळा पुढच्या महिन्यामध्ये पार पडणार होता. त्यांचा साखरपुडा हा संघरेडी गावाच्या एका मुलीसोबत झाला होता. अकाली दलाच्या एका ज्येष्ठ नेत्यांच्या भाचीसोबत सिद्धू यांचे लग्न ठरले होते. सिद्धू यांचे लग्न या वर्षाच्या सुरुवातीला होणार होते. पण, पंजाब विधानसभा निवडणूकांमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा
सिद्धू मूसेवाला यांचा साखपुडा संघरेडी गावामधील अमनदीप कौर यांच्यासोबत झाला होता. अमनदीप कौर या कॅनेडा येथे राहातात. त्या पीआरचे काम करतात. जवळपास दोन वर्षाआधी सिद्धू आणि अमनदीप यांचा साखरपुडा झाला होता.
सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. शहनाज गिल, भगवंत मान आणि करण कुंद्रा या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.
पाच जण ताब्यात
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी डेहराडून येथून पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा :
- Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तिहार जेलमध्येच रचला, दिल्ली पोलिसांच्या हाती लागली महत्वपूर्ण माहिती
- Sidhu Moosewala Murder Case : सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा
- Sidhu moose Wala : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर कंगनाचा पंजाब सरकारवर निशाणा; पोस्ट शेअर करत म्हणाली...