Sidhu Moosewala Murder : पंजाबी गायक-राजकारणी सिद्धू मुसेवाला यांची रविवारी (29 मे) पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहर गावाजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) दावा केला आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि त्यांचे साथीदार या हत्येत सामील आहेत. आता पंजाब पोलिसांना या हत्येसाठी रचलेल्या कटाबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. पंजाब पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धूला मारण्याची प्लानिंग लॉरेन्स बिश्नोई या गॅंगस्टरने दिल्लीत बसून केली. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये (Tihar Jail) कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने जेलमधूनच हा कट काही महिन्यापूर्वीच रचला होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगात बसून मुसेवालाच्या हत्येचा कट रचला असल्याचा पोलिसांना संशय आहे.  लॉरेन्स बिश्नोईने तिहार तुरुंग क्रमांक 8 मध्ये बसून पूर्ण प्लान बनवला आणि आपल्या शूटरला सिद्धूला मारण्याची सुपारी दिली. बिश्नोईने या कामासाठी व्हर्च्युअल नंबरचा वापर केला आणि याच नंबरद्वारे परदेशात असलेल्या या हत्येचा दुसरा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारशी अनेकदा बोलत होता. SIT टीम लवकरच लॉरेन्सची चौकशी करणार आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवालाच्या हत्येचा कट रचण्यासाठी तिहार जेलमधून वापरला गेला. या संपूर्ण प्लानिंगची माहिती दिल्ली पोलिसांनी  दोन लाखांचे बक्षीस असलेल्या शाहरुख नावाच्या कुख्यात गॅंगस्टरला अटक केल्यानंतर मिळाली. शाहरुखने ती सर्व नावं पोलिसांना दिली जी या हत्येमध्ये सामिल होती.


शाहरूखने सांगितलेली नावे



  • गोल्डी ब्रार

  • लॉरेन्स बिश्नोई

  • जग्गु भगवानपुरिया

  • अमित काजला

  • सोनू काजल

  • बिट्टू

  • सतेंदर काला

  • अजय काला 

  • प्रसिद्ध गायक मनकिरत औलख यांचे मॅनेजर 


दिल्ली पोलिसांचा दावा आहे की, सिद्धूला मारण्यासाठी आधी शाहरुखला सुपारी दिली गेली होती. काही महिन्यांपूर्वी सिद्धूला मारण्यासाठी सापळा रचला गेला होता. पण त्यावेळी मुसेवाला यांच्यासोबत असलेली सुरक्षा पाहता हल्ला नाही केला गेला. कारण सिद्धूच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांकडे एके 47 होती, त्यानंतर ही हत्या करण्यासाठी शाहरुखने एके 47 आणि बिअर स्प्रेची मागणी केली. शाहरुख गोल्डी ब्रारशी बोलण्यासाठी सिग्नल अॅप वापरायचा. त्याचा फोन स्पेशल सेलकडे असून त्याची चौकशी सुरू आहे.


हत्या का करण्यात आली? 


या प्रश्नाचे उत्तर व्हायरल झालेल्या दोन फेसबुक पोस्टमध्ये दिसत आहे.  ज्यात बिश्नोई आणि ब्रार मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेत असल्याचा दावा केला जात आहे.


'या' पोस्टमध्ये काय  लिहिल गेलं आहे?


‘मी, माझा भाऊ गोल्डी ब्रारसह सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतो. लोक वाटेल ते म्हणतील, पण आम्ही आमचा भाऊ विकी मिद्दूखेरा याच्या मृत्यूचा बदला घेतला. सिद्धू मुसेवालाने आमच्या भावाला मारण्यात मदत केली होती.
मी त्याला जयपूरहून फोन करून सांगितले होते की, त्याने जे केले ते चुकीचे आहे. त्याने मला सांगितले की, तो कोणाचीही पर्वा करत नाही आणि त्याने मला आव्हान दिले की त्यानेही शस्त्रे भरून ठेवली आहेत. त्यामुळे आता आम्ही आमच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. आमच्या भावाच्या हत्येत कोणाचा हात आहे, त्यांनी सावध राहावे.’ सिद्धूची हत्या विकीच्या हत्येचा बदला होता असे लॉरेन्स बिश्नोईच्या या कथित व्हायरल पोस्ट मध्ये म्हंटलं गेलं. पण विकी मिद्दूखेरा हत्येमध्ये सिद्धूचा हात असल्याचा कोणता ही पुरावा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. तर जर बिश्नोईने ही हत्या केली आहे तर का या प्रश्नच उत्तर पोलिस शोधत आहेत.


कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?



  •  31 वर्षीय लॉरेन्स बिश्नोई 2017 पासून राजस्थानमधील भरतपूर तुरुंगात आहे 

  •  खुनाचा प्रयत्न, घुसखोरी, दरोडा आणि प्राणघातक हल्ला यांसारख्या IPC कलमांखाली गुन्ह्यांचा आरोप आहे.

  • काळ्या हरणांना पवित्र मानणाऱ्या बिश्नोई समाजातील "गुंड" बिश्नोईने 2018 मध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला संपवण्याच्या योजना केली होती. 

  • 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात खानला दोषी ठरवण्यात आले होते. लॉरेन्सच्या एका सहाय्यकांनी असा दावा केला होता की, लॉरेन्सला खानकडून काळवीट मारल्याचा बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी कट ही रचण्यात आला होता पण त्याचा एक साथीदार अटक झाला

  • लॉरेन्सचा जन्म पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील धत्तरनवली येथे एका गरीब कुटुंबात झाला आणि चंदीगडच्या DAV कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. दशकापूर्वी तो पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षही होता.


गोल्डी ब्रार


गोल्डी ब्रार,याचे खरे नाव सतींदर सिंग आहे. तो लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. 2021 मध्ये फरीदकोट जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येसारख्या अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामिल असलेला ब्रार आता कॅनडामध्ये आहे. पहलवानच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ब्रारच्या नातेवाईकाला अटक केली होती. त्यावेळी, पोलिस सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की ,2020 मध्ये माजी SOPU प्रमुख गुरलाल ब्रार यांच्या हत्येचा बदला म्हणून पहलवानची हत्या करण्यात आली होती. गुरलाल ब्रार हे देखील गोल्डी ब्रारचे चुलत भाऊ होते.


शगनप्रीत सिंग


या प्रकरणात आणखी एक नाव पुढे येत आहे ते म्हणजे शगनप्रीत सिंगचे. तो सिद्धू मूस्वालाचा व्यवस्थापक होता आणि विक्की मिद्दुखेरा यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांना हवा होता. तो ऑस्ट्रेलियात पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.


संबंधित बातम्या