Sidhu Moosewala Murder : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमागील कारण आता समोर आले आहे. मानसाचे एसएसपी गौरव तुरा यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे याबाबत मोठा खुलासा केला आहे. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे गौरव तुरा यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांनी आज बुलेटप्रुफ गाडी घेतली नव्हती, शिवाय त्यांच्यासोबत आज त्यांचा अंगरक्षक देखील नव्हता. याचाच फायदा घेत त्यांच्यावर 9 एमएम पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्यावर गोलीबार झाला त्यावेळी सिद्धू मुसेवाला हे स्वतः गाडी चालवत होते. लॉरेन्स बिश्नोई आणि लकी पटियाल यांच्यातील टोळीयुद्धामुळे मूसवाला यांची हत्या करण्यात आलीची माहिती पोलिसांनी दिली असून लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
टोळीयुद्धातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
2021 मध्ये विकी मिड्डूखेडा यांची हत्या झाली होती. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या तीन गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच पकडले आहे. शार्प शूटर सज्जन सिंग उर्फ भोलू, अनिल कुमार उर्फ लठ आणि अजय कुमार उर्फ सनी कौशल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या सर्वांना पंजाब पोलिसांनी तिहार तुरुंगातून रिमांडवर घेतले होते. त्यावेळी एका प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरचा या हत्येत सहभाग असल्याचे तिघांनी चौकशीत सांगितले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीमधील पंजाबी गायक हा सिद्धू मुसेवाला होता. पोलिसांना संशय आहे की विक्की मुदुखेरा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा होता आणि त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने सिद्धू मुसेवालाला त्याच्या गुंडांकरवी मारले असावे. कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार हा बिश्नोई टोळीसोबत दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये कार्यरत आहे.
महत्वाच्या बातम्या