9 एप्रिल रोजी दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी जीपच्या बोनेटवर काश्मिरी तरुणाला बांधल्याचं मेजर लितुल गोगोई यांनी सांगितलं होतं. गोगोई यांचा भारतीय सैन्यातर्फे सत्कार करण्यात आला होता. मात्र मेजर गोगोई यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
फारुक अहमद दर हा जम्मू काश्मीरमधील कशिदा कारागीर आहे. 'एका अधिकाऱ्याने तुमच्या मुलाला जीपसमोर बांधलं असतं, तर त्याचाही तुम्ही सत्कार केला असतात का, हे मला पहायचं आहे' असं गोगोई यांचा सत्कार केल्यानंतर फारुकने सैन्याला उद्देशून म्हटलं होतं.
'त्या' दिवशी मी दगडफेक करणं तर दूरच, साधा दगड उचलला होता, हे सिद्ध करुन दाखवा, असं आव्हान फारुक दरने केलं होतं. श्रीनगरमधील पोटनिवडणुकांतील मतदारांपैकी आपण एक असल्याचा पुनरुच्चार त्याने केला.