मुंबई : मुंबईतील नॅशलन स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडिंग तीन तासांच्या खोळंब्यानंतर सुरु झालं आहे. सकाळपासून तांत्रिक बिघाडामुळं बंद पडलं ट्रेडिंग बंद करण्यात आलं होतं.


नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये दररोज 78 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र कॅश सेगमेंट बंद झाल्याने स्टॉक एक्सचेंजने ट्रेडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान हा तांत्रिक बिघाड कशामुळे झाला, त्याचं उत्तर अद्याप देण्यात आलेलं नाही. अर्थ मंत्रालयाकडूनही याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे ही अडचण आली असावी, असं काहींचं म्हणणं आहे.