बिजेपूर (ओदिशा) : ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. ओदिशातील बिजेपूर भागात एका रॅलीला संबोधित करत असताना एका तरुणाने पटनायकांवर चप्पल फेकली. मात्र पटनायक यांच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच चप्पल पकडली. या घटनेनंतर उपस्थित जमावानं तरुणाला बेदम मारहाण केली.



(फोटो सौजन्य : ANI)

तरुणाच्या या कृत्यामागचं कारण अद्याप समजलेलं नाही. दरम्यान, या कृत्यानंतर पोलिसांनी तातडीनं तरुणाला ताब्यात घेतलं.


अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुख्यमंत्री पटनायक आणि त्यांचे सुरक्षा रक्षकही काही काळ भांबावले. मात्र, सुरक्षारक्षकांनी तत्परता दाखवत पटनायक यांना स्टेजवरुन बाजूला केलं.

दरम्यान, याआधीही बालासोरमधील एका कार्यक्रमात एका महिलेने पटनायक यांच्यावर अंड फेकलं होतं. त्यावेळेसही महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.