एक्स्प्लोर
पुतण्याविरोधात काकांचा शड्डू, शिवपाल यादवांकडून नव्या पक्षाची घोषणा

लखनौ : महाराष्ट्रात राज ठाकरेंनी काकांविरोधात शड्डू ठोकत वेगळा पक्ष काढला होता, तर उत्तर प्रदेशमध्ये मात्र काकांनी पुतण्याविरोधात बंड पुकारत नवा पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. शिवपाल यादव यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. समाजवादी पक्षातील यादवी संपली असं वाटत असतानाच एक-एक यादव पुढे येऊन अखिलेश यांच्या उत्तर प्रदेश जिंकण्याच्या मनसुब्यांना खो देत आहेत. शिवपाल यादव यांनी 11 मार्चनंतर म्हणजेच निकालानंतर नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे एकीकडे सपाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे पुतण्याविरोधात पक्ष संघटनाचं कामही सुरु दिसत आहे. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे शिवपाल यादव नाराज आहेत. यापूर्वीही काका-पुतण्यामध्ये संघर्ष झाला आहे.
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती






















