Maharashtra Bus Accident in Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्यातचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय 11 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे.  मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी मध्य प्रदेशातील प्रशासनाच्या संपर्कात आहेत. 


ओळख पटवण्यात आलेल्या मृतांची नावे पुढील प्रमाणे:


1.चेतन राम गोपाल,  राजस्थान


2.जगन्नाथ हेमराज जोशी वय 70 वर्ष, मल्हारगड उदयपूर राजस्थान


3.प्रकाश श्रवण चौधरी वय 40 वर्ष, अमळनेर जळगाव महाराष्ट्र


4. नीबाजी आनंदा पाटील वय 60 वर्ष, पिळोदा अमळनेर जळगाव 


5. कमलाबाई  निबाजी पाटील, वय 55 वर्ष, पिळोदा अमळनेर जळगाव


6.चंद्रकांत एकनाथ पाटील उम्र 45 वर्ष, अमळनेर जळगाव (एक ते सहा क्रमांकावरील मृतांची ओळख त्यांच्या आधार कार्डद्वारे करण्यात आली.


7. श्रीमती अरवा मुर्तजा बोरा वय 27 वर्ष,  मूर्तिजापुर अकोला महाराष्ट्र


8. सैफुद्दीन अब्बास, नूरानी नगर इंदूर


 


अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन 


अपघाताबाबत एसटी महामंडळाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022-23023940  हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेदेखील हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 या क्रमांकावर तर,  जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी 02572223180,  02572217193 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. 


मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त 


 मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.