Presidential Election 2022 LIVE : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी चेहरा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. त्यामुळं साहजिकच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज मतदान झाल्यानंतर निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचा मुक्काम मुंबईतील हॉटेल ट्रायडंट मध्ये आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 9 वाजता विधान भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
असं आहे मतांचं गणित
राष्ट्रपती निवडणुकीत एकूण 4809 मतदार, मतांचं एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431
लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार मतदार, खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 200
सर्व राज्यांतील 4033 आमदार मतदार, प्रत्येक राज्यात मतांचं मूल्य वेगवेगळं
विविध राज्यांतील आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 231
सध्याचं चित्र पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी जन्म
सुरुवातीला शिक्षिका म्हणून नोकरी, त्यानंतर राजकारणात प्रवेश
1997 मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून विजयी
2000 ते 2009 ओडिशा विधानसभेत आमदार, 2000 ते 2004 या काळात कॅबिनेट मंत्री
2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणूननियुक्ती
कोण आहेत यशवंत सिन्हा?
बिहारच्या पाटणामध्ये 6 नोव्हेंबर 1937 रोजी जन्म
1960 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल, 24 वर्षे प्रशासकीय सेवा
1990 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये अर्थमंत्री, 1998 ते 2004 वाजपेयी सरकारमध्ये मंत्री
या बातम्या देखील अवश्य वाचा
- Presidential Elections 2022 : देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता; एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड
- Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, शरद पवारांसह राहुल गांधी उपस्थित
- Vice President Election 2022: जगदीप धनकड उपराष्ट्रपती होणार का? जाणून घ्या काय आहेत राजकीय समीकरणे
- Presidential Election 2022 : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान, कोण मारणार बाजी? निकाल कधी? वाचा सविस्तर