नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला ठेंगा दाखवला. कारण मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला स्थान मिळालं नाही.  त्यामुळे शिवसेना शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली.


 

शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यावर बहिष्कार घातला नाही. काल बहिष्काराच्या बातम्या आल्या. मात्र आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

 

गेल्यावेळी खासदार अनिल देसाई शपथ घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. मात्र भाजप आणि सेनेतील वादामुळं ते शपथ न घेताच मुंबईला परतले होते.  यावेळी तरी वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा शिवसेनेला होती. मात्र सेनेला वाढीव मंत्रिपद मिळालं नाही.

 

19 जणांना शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार अखेर पार पडला. या मंत्रिमंडळात दहा राज्यातून 19 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. या सर्वांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडला.

 

पर्यावरण विभागाचा स्वतंत्र प्रभार सांभाळणाऱ्या प्रकाश जावडेकरांना बढती मिळाली.त्यांनी  कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

दुसरीकडे जळगावातील पॉवरफुल नेते एकनाथ खडसे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपनं केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.

 

एकीकडे 19 जणांना मंत्रिमंडळात स्थान देताना 5 जणांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आहे.

 

या पाच मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सोपवला आहे. यामध्ये निहालचंद, राम शंकर कठेरिया, सांवर लाल जाट, मनसुखभाई डी वासवा आणि एम के कुंडारिया यांचा समावेश आहे.

 

संबंधित बातम्या

शपथ घेताना रामदास आठवले नाव विसरलेे !


जावडेकरांचं प्रमोशन, आठवले, भामरेंना मंत्रिपदाची शपथ !


केंद्रीय मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांनी राजीनामा सोपवला !