एक्स्प्लोर

शिवसेनेचा दुटप्पीपणा : ‘सामना’तून टीका, दिल्लीत गितेंचं उपोषण

अनंत गिते यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून उपोषणात हजेरी लावल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर, तातडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत आदेश धाडले आणि अनंत गितेंना उपोषणातून तातडीने उठण्याचे आदेश दिले.

नवी दिल्ली : एकीकडे भाजपच्या उपोषणावर ‘सामना’मधून टीका केली गेली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते मात्र दिल्लीत भाजपसोबत उपोषणाला बसले होते. मात्र एबीपी माझाने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर गितेंनी उपोषणाच्या मंचावरुन काढता पाय घेतला. मात्र अनंत गिते हे पक्ष किंवा उद्धव ठाकरेंचे आदेश, भूमिका मानत नाहीत का, हा प्रश्न कायम आहे. सामनातून भाजपच्या उपोषणावर टीका “हिंदुस्थानच्या राजकारणात सध्या एकमेकांची टोलवाटोलवीच सुरू आहे. काँग्रेसचे उपोषणास्त्र फसल्यावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘भाजप’ने एक दिवसाचा उपवास करायचे ठरवले आहे. मोर आणि लांडोरांची ही अशी स्पर्धा सुरू आहे, पण देशातील मोठ्या वर्गाचे हाल व उपासमार थांबत नसल्याने आत्महत्यांचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे या उपवासनाट्याने काय साध्य होणार?”, अशा शब्दात ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. ट मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना स्वपक्षाचीच ‘सामना’तील भूमिका मान्य नसावी. म्हणून की काय, ते दिल्लीत भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून उपोषणाला बसले होते. अनंत गिते काय म्हणाले? लोकसभेचं अधिवेशन विरोधकांनी ठप्प केले. त्यांच्या निषेधार्थ हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आहे. स्वत: पंतप्रधान उपोषण करणार आहेत, असे सांगत अनंत गिते पुढे म्हणाले, “सरकारचा एक भाग म्हणून उपोषणाला बसलो आहे. मी सरकारचा अंग आहे. मंत्री म्हणून इथे आलो आहे.” ‘सामना’चा अग्रलेख ‘सामना’चा आहे. त्यांना आपलं मत मांडण्याच पूर्ण अधिकार आहे. आपल्याला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे म्हणत अनंत गितेंनी मात्र स्वपक्षाची भूमिकाच मान्य नसल्याचे अधोरेखित केले. माझाच्या बातमीनंतर गितेंचा मंचावरुन काढता पाय अनंत गिते यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून उपोषणात हजेरी लावल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर, तातडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत आदेश धाडले आणि अनंत गितेंना उपोषणातून तातडीने उठण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर अनंत गितेंनी उपोषणाच्या मंचावरुन काढता पाय घेतला. शिवसेनेच्या अनेक मंत्री आणि नेत्यांनी अनंत गितेंच्या उपोषणातील सहभागाबद्दल नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Embed widget