एक्स्प्लोर

अविश्वास प्रस्तावावर शिवसेना मोदी सरकारच्या पाठीशी

याआधी अविश्वास ठरावादरम्यान शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा रंगली होती.

नवी दिल्ली : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावं यासाठी शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य न केल्यामुळे टीडीपीने एनडीएशी फारकत घेतली. आता पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्याच्यावर उद्या लोकसभेत मतदान होणार आहे. याआधी अविश्वास ठरावादरम्यान शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. "अनिवार्य रुप से उपस्थित रहकर सरकार के पक्ष का समर्थन करें", अशी या व्हिपमधली शेवटची ओळ आहे. या संदर्भात उद्या सकाळी दहा वाजता शिवसेनेची बैठक होणार आहे. शिवसेना सभागृहाबाहेर कायम मोदी सरकारवर टीका करत असते. सामनातूनही मोदींविरोधात भूमिका घेतल्या जातात. लोकसभेत मात्र शिवसेना मोदींच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे. दरम्यान लोकसभेत शिवसेनेचे सध्या 18 खासदार आहेत. लोकसभेतील आकडेवारीचं गणित लोकसभेत 545 सदस्यसंख्या आहे. त्यापैकी 2 राष्ट्रपती नियुक्त आहेत. म्हणजेच एकूण 543 खासदार निवडून आलेले आहेत. सध्या 9 जागा रिक्त आहेत. म्हणजे सध्या 534 खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 268 झाला आहे. लोकसभेत सर्वाधिक खासदार असलेल्या एकट्या भाजपकडे तब्बल 272 खासदारांचं बळ आहे. म्हणजेच भाजप एकट्याच्या बळावर अविश्वास प्रस्ताव फेटाळू शकेल. त्यामुळे सरकारला धोका नाही. दुसरीकडे भाजपच्या मित्रपक्षांचे मिळून 40 खासदार आहेत. त्यामुळे एनडीएकडे भाजप 272 + मित्रपक्ष 40 म्हणजेच एकूण 312 खासदारांचं समर्थन आहे. यामध्ये शिवसेना 18, एलजेपी 6, अकाली दल 4, आरएलएसपी 3, अपना दल 2, जेडीयू 2 आणि एन आर काँग्रेस, पीएमके, एनपीपी, एनडीपीपी, एसडीपी यांच्या प्रत्येक एक खासदाराचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget