उद्या (26 नोव्हेंबर) संविधान दिनानिमित्त काँग्रेस संसदेत एक आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या या आंदोलनात शिवसेनादेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात शिवसेनेच्या चार खासदारांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस नेते आणि संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार अनिल देसाई आणि खासदार राहुल शेवाळे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली.
शिवसेनेसोबतची सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेसच्या मनात काही शंका होत्या. या भेटीत शिवसेना नेत्यांनी त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.