नवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याचे पडसाद संसदेतही उमटू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केल्याच्या निर्णयावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ माजवला होता. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.
दरम्यान, महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचे दिल्लीत पडसाद उमटू लागले आहेत. भाजपच्या माहाराष्ट्रातील सत्तास्थापनेला विरोध करण्यासाठी नवी दिल्लीत संसद भवन परिसरात काँग्रेसने निदर्शने केली. संसद भवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन काँग्रेसने महाराष्ट्रातील भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. लोकशाहीची हत्या करणे बंद करा, अशा घोषणा यावेळी काँग्रेस नेत्यांनी यावेळी दिल्या. या आंदोलनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते.
लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यास सांगितले होते. परंतु राहुल गांधी यांनी प्रश्न विचारण्यास नकार दिला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. अशा परिस्थितीत माझ्या प्रश्न विचारण्याला काहीही अर्थ उरत नाही. यावेळी सभागृहात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीदेखील उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, राहुल गांधींचं टीकास्त्र तर सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांचं संसदेबाहेर आंदोलन
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
25 Nov 2019 06:22 PM (IST)
महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचे पडसाद संसदेतही उमटू लागले आहेत. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधीमहाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंनतर लोकसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. परिणामी लोकसभेचं कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -