जम्मू: जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देशविरोधी कार्यात तिचा सहभाग असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून यासंदर्भात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं आहे.


शेहला रशीदचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनी जम्मूच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते काश्मीरहून जम्मूला आले आहेत." जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.


प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "शेहलाने 2017 साली काश्मीरच्या राजकारणात भाग घेतला होता. ती सीपीआयएम पक्षाची सक्रिय सदस्यदेखील आहे. या आधी तिने सीपीआयएमच्या तिकीटावर मेरठमधून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. आता तिचा सहभाग जम्मूच्या राजकारणात आहे. तिच्या एनजीओला मिळणाऱ्या फण्डिंगचा  वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जातोय."


शेहला रशीदच्या एनजीओला परदेशातून फण्डिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी नारे दिले जातात ते चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी सांगितलं की एका कट्टरवादी पक्षाची स्थापना करण्यासाठी शेहलाला तीन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. शेहला चालवत असलेल्या एनजीओची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केली आहे.


गेल्या वर्षी शेहला रशीदवर एका ट्वीट प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. आता थेट शेहलांच्या वडिलांनीच तिच्यावर देशविरोधी कारवायात सहभागी असल्याचा आरोप केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


शेहला रशीदने आरोप फेटाळले
वडिलांनी केलेल्या या आरोपाला उत्तर देताना शेहला रशीदने ट्विटरवरुन आपली बाजू मांडली आहे. तिनं सांगितलं आहे की, "तिचे बायोलॉजिकल वडील तिच्या आईला मारहाण करत होते. त्यांच्याविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे." आता त्यांच्याकडून आपल्याला बदनाम करण्याचे करण्यात येत असल्याचा आरोपही तिने केला आहे.


पहा व्हिडिओ: 'माझ्या मुलीचा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग'; JNUची माजी विद्यार्थिनी शेहला रशिदच्या वडिलांचा आरोप



महत्वाच्या बातम्या: