Shaurya Patils Death Case: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) यांच्या निर्देशानुसार, नवी दिल्लीतील सेंट कोलंबा शाळेशी संबंधित शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची (Delhi Shaurya Patils Death Case) चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीचे नेतृत्व एसीपी रमेश लांबा करतील, तर डीसीपी आदित्य गौतम आणि उपनिरीक्षक रोहित कुमार हे या पथकात असतील. सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) नेतृत्वाखालील पार पडलेल्या खासदारांची बैठक अमित शहांनी विशेष तपास पथकासंदर्भात निर्देश दिले आहे. (Supriya Sule on Shaurya Patils Death Case)

Continues below advertisement

Delhi Shaurya Patils Death Case : शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन

दिल्लीतील (Delhi) सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली होती. शौर्य प्रदीप पाटील (Shaurya Patil), असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली (Sangli) जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. सोबतच राज्याचे राजकारण देखील तापले होते. दरम्यान याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या खासदारांनी या संदर्भात अमित शाहांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. अशातच आता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या खासदारांची बैठक अमित शहांनी विशेष तपास पथकासंदर्भात निर्देश दिले आहे.

Continues below advertisement

Supriya Sule on Shaurya Patils Death Case : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील खासदारांची बैठक, अमित शहांचे निर्देश

सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील खासदारांचे शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी एसआयटीचे निर्देश दिले आहेत. शिष्टमंडळामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत खासदार नीलेश लंखे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, राजाभाऊ वाझे आणि भास्कर भागरे हे खासदार उपस्थित होते. यापूर्वी, राजा गार्डन मेट्रो पोलिस स्टेशनमधून हे प्रकरण दिल्ली गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. किंबहुना, तपासाची गती आणि गांभीर्य याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पोलीस तपासावर लावण्यात आलेल्या काही आरोपांमध्ये शौर्यच्या वर्गमित्रांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात फेरफार करणे, 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज न दाखवणे, ज्या दिवशी शौर्यने आत्महत्या केली होती, इत्यादींचा समावेश होता. मात्र आता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या खासदारांची बैठक अमित शहांनी विशेष तपास पथकासंदर्भात निर्देश दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा